मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्कार

येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्काराचे वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभु, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सुलेखा कुंभारे, विधान परिषदेचे सदस्य भाई गिरकर, खासदार हरीशचंद्र चव्हाण, विकास महात्मे आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मास कम्युनिशनचे महासंचालक के.जी.सुरेश, महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे व अन्य वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.



सामाजिक समतेची कास धरणा-या महाराष्ट्रातील चार पत्रकारांना मुकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले. झी 24 तास चे संपादक ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री कुवळेकर यांनी गाव पातळीवरच्या समस्यांना वाचा फोडली. राज्यातील पाण्याचा प्रश्न मांडला, समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न विजय कुवळेकरांनी केला. त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून त्यांना प्रथम मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्काराने गौरिवण्यात आले.



लोकसत्तेचे सहायक संपादक मधु कांबळे यांनाही, त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून केलेल्या पत्रकारितेसाठी 'मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्कारा' ने गौरविण्यात आले.