प्रसिध्द नाटय लेखक अभिराम भडकमकर,नाटय दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबला वादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्काराने यंदा सन्मानित करण्यात आले.
प्रसिद्ध मराठी चिंतनशील लेखक डॉ. म.सु.पाटील लिखित 'सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध' या समीक्षा ग्रंथास आणि रहमान अब्बास यांच्या 'रोहजीन' या उर्दू कांदबरीला वर्ष २०१८ साठीचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.